anandnagri logo

संपादकीय मनोगत

दैनिक आनंद नगरी एक यशस्वी वाटचाल .....

आपले सर्वांचे दैनिक आनंदनगरीच्या वतीने हार्दीक.. हार्दीक स्वागत

        आपले दैनिक आनंदनगरी हे एक सर्वसामान्य वाचकांचे दैनिक व जालनेकरांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून एक उलेखनिय कार्य फार जबाबदारीने आणि सकारात्मक विचाराने मागील वर्षापासून जालना शहरासह संपूर्ण जिल्हयात करत आहे त्याचबरोबर आपल्या या माध्यमातून हे दैनिक समाजजागृती चे कार्यही प्रामाणिकपणे करत आहे. अल्पावधीतच दैनिक आनंदनगरी ने सकारात्मक विचार,सर्व स्तरातील बातम्यांना स्थान,स्पर्धा परीक्षेविषयी चे विशेष सदर व यशाची गुरूकिल्ली हे विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठीआणखी एक वेगळे सदर दैनिक सुरूवातीपासूनच प्रकाशित करत आहे. अल्पकालावधीत दैनिकास मिळत असलेला वाचकांचा प्रतिसाद , हितचिंतकांचा पाठींबा व जाहीरातदारांची यशस्वी साथ या त्रिसूत्रीच्या याबळावर दैनिक आजमितीला जालन जिल्हयातील काही भागात जसे घनसांगवी,रेणुकाई पिंपळगाव,अंबड व परतूर तालुका आदी ठिाकाणी नंबर एक खपाचे दैनिक म्हणून ओळखल्या जाऊ लागले आहे. आज रोजी दैनिक आनंदनगरी जालना जिल्हयासह औरंगाबाद,बीड,लातूर,नांदेड,परभणी,हिंगोली आदी सात जिल्हयातून दररोज प्रकाशित होत आहे.

         आजमितीला दैनिक आनंदनगरी सोबत संपूर्ण मराठवाड्यात 500 पेक्षा जास्त वितरक व वार्ताहर त्यासोबतच 200 पेक्षा जास्त पूर्णवेळ कर्मचारी संस्थेत मराठवाडाभरात काम करत आहेत त्याबरोबरच सर्वच जिल्हयात उत्तम प्रतिसाद दैनिकाला मिळत असून मराठवाड्यातील सर्वच तालुक्यात दैनिक आनंदनगरीन पोहचला आहे. दररोजच्या बातम्यांच्या कामाव्यतिरीक्त सामाजिक जाणीवेतून दैनिक आनंदी महीला मंच, लहान मुलांसाठीचे मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन, दुष्काळ निवारण, जलसंधारण आणि जालना मॅरेथॉन , त्याबरोबरच आरोग्याविषयी ची जागरूकता आदी बाबीवर प्रभावीपणे कार्य करत आहे अथक व प्रामाणिक प्रयत्न व सतत लोक व लोकसमूह सोबत जोडण्याचे उत्तम काम उत्तम प्रकारे दैनिक आनंदनगरी याठिकाणी करत असून आपल्या सर्वांच्या आर्शिवादाच्या बळावर हे दैनिक येणार्‍या काळात निश्‍चितपणे संपूर्ण महाराष्ट्रात गेलेले दिसेल यात शंका नाही सर्वसामान्या वाचकांचे हीत व समाजकार्याचे काम दैनिक आनंदनगरी यापुढेही असेल सुरू ठेवेल अशी ग्वाही मी यावेळी दैनिक आनंदनगरीच्या माध्यमातून आपणा सर्वांन देतेा.

धन्यवाद ......

आपला ,

शिवरतन मुदंडा,

संस्थापक संपादक

दै. आनंदनगरी


Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920