anandnagri logo

जालना मॅरथॉन

सर्व सन्मानीय वाचक बांधव , 

दैनिक आनंदनगरी,

       आपणा सर्वांसमोर एक आगळा-वेगळा उपक्रम आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपिठ असलेल्या दैनिक आनंदनगरीच्या माध्यमातून या ठिकाणी मांडताना मला अंत्यत आनंद होतो आहे की , दैनिक आनंदनगरीची आजपर्यंतची सकारात्मक विचाराचे दैनिक म्हणूनची वाटचाल आपल्या सर्वांच्या पाठींब्यासोबतच प्रेरणेच्या बळावर अंत्यत यशस्वी व सुखकर राहीली असून त्याच विश्‍वासातून आपण येत्या रविवार , दिनांक 1 मार्च 2015 रोजी जालनेकरांसह संपूर्ण मराठवाड्यातील युवा त्याचबरोबर नागरीकात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होऊन एक सशक्त व निरोगी पिढी उभी राहावी आणि जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यातील सुजाण नागरिकांनी आमच्या या छोट्याशा प्रयत्नाचा स्विकार करत तो काही प्रमाणात अंगिकृत करावा अशा अल्पशा आशेने एक आरोग्यमय व आरोग्यदायी सुरवात आपण दैनिक आनंदनगरीच्या माध्यमातून याठिकाणी करणार आहोत .

         मित्रहो,.... पत्रकारीता म्हणजे केवळ बातम्या देणे नव्हे..आपल्या अवतिभवती सकारात्मक बदल घडवून आणणे..सामाजिक भान व् बांधिलकी जपणे..आपल्या गावासाठी उत्तरादायित्व ठरणे....त्या आधारावर आणि त्याच जागरूकतेने ‘ दैनिक आनंदनगरी आयोजित करत आहे- सलग दुसरी मराठवाडास्तरीय जालना मॅरथॉन - रविवार , दिनांक , 1 मार्च 2015 ! ‘जालना येथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी रेसिंडन्सी यांच्या सहकार्याने . आपण दैनिक आनंदनगरी च्या अंतर्गत आजवर बरेच लोकापयोगी उपक्रम राबवल े, जसे की नदी साफसफाई, नदी खोलीकरण , सिना नदीवरील हनुमान घाट येथील बंधारा असो किंवा लहान मुलांसाठीचे यशाची गुरूकिल्ली सदर , स्पर्धा परिक्षेविषयीची प्रश्‍न - उत्तरे मालिका , शिक्षण क्षेत्रातील सेवांविषयींच्या माहीतीसाठीचे विशेष सदर व अलिकडच्या काळातील आरोग्याविषयी जागरूकतेसाठीचे फिटनेस फर्स्ट व हेल्थ कंन्सलटंन्ट आदी उपक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न , हे सर्व उपक्रम जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यातील वाचकांनी अतिउदंड प्रतिसाद देत अक्षरश डोक्यावर घेतले असे मला या ठिकाणी अभिमानाने नमूद करावेसे वाटते . त्याच श्रेणीत थोडस पुढ जात हा आपला आणखी एक आरोग्यदायी व आरोग्यमय महत्वाकांक्षी उपक्रम . आता जालना जिल्हयासह मराठवाड्यातील सुजान नागरिकांसाठी ‘दैनिक आनंदनगरी आयोजित - सलग दुसरी मराठवाडास्तरीय जालना मॅरथॉन स्पर्धा , रविवार दिनांक 1 मार्च 2015 ! . चला तर मग भाग घेऊयात आरोग्यदायी व आरोग्यमय अशा या ‘ ‘दैनिक आनंदनगरी आयोजित - सलग दुसरी मराठवाडास्तरीय जालना मॅरथॉन स्पर्धेत , रविवार दिनांक 1 मार्च 2015 ! . तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आमचा विश्‍वास व आनंद वाढवावा अशी विनंती करीत मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवितो , धन्यवाद .

आपला ,

रविंद्र बांगड,

मुख्य संपादक,

दैनिक आनंदनगरी , जालना

Marathon Online Registration

Our Social Presence

Marathon Video

व्हिडिओ बातमी:-Science of Marathon Running


Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920