anandnagri logo

सामाजिक उपक्रम

प्रति ,

सन्मानीय वाचक बांधव ,

       आपणा सर्वांसमोर एक आगळा-वेगळा सामाजिक उपक्रम सर्वांच्या हक्काचे व्यासपिठ असलेल्या दैनिक आनंदनगरीच्या माध्यमातून या ठिकाणी मांडताना मला अंत्यत आनंद होतो आहे की , दैनिक आनंदनगरीची आजपर्यंतची सकारात्मक विचाराचे दैनिक म्हणूनची वाटचाल आपल्या सर्वांच्या पाठींब्यासोबतच प्रेरणेच्या बळावर अंत्यत यशस्वी व सुखकर राहीली आहे .

        पत्रकारीता म्हणजे केवळ बातम्या देणे नव्हे..आपल्या अवतिभवती सकारात्मक बदल घडवून आणणे..सामाजिक भान व बांधिलकी जपणे..आपल्या गावासाठी उत्तरादायित्व ठरणे....त्या आधारावर आणि त्याच जागरूकतेने दैनिक आनंदनगरी ने दैनिकाच्या माध्यमातून आजवर बरेच लोकापयोगी उपक्रम राबवले.

          जालना शहरातून वाहणार्‍या दोन नद्या कुंडलिका व सिना आदी दोंहोंचे कालांतराने लहान होत गेल्याने नाल्याचे स्परूप त्यांना प्राप्त झाले होते , ही मुख्य बाब लक्षात घेत 2014 साली या ऐतिहासिक अशा दोन्ही नदी पात्रांची साफसफाई लोकसहभागातून करण्याचा निर्णय दै. आनंदनगरी परिवाराने घेतला व त्यानुसार लगेचच कामाला सुरूवात करत , नदी साफसफाई व खोलीकरण केले त्यासोबतच सिना नदीवरील हनुमान घाट येथे बंधारा उभारण्यात आला . त्याच मार्गावर पुढे जात या वर्षी दैनिक आनंदनगरी परिवाराने शहरातील कन्हैयानगर परिसराच्या मागील भागातून वाहणार्‍या सिना नदीपात्राचे जवळपास 8 कि. मी . पर्यंतचे रूंदीकरण व खोलीकरण लोकसहभागातून कार्यास सुरूवात केली आहे त्यासोबतच काही ठिकाणी बंधारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

          या अलौकिक सामाजिक कार्यातील लोकवाट्याचा हिशोबाचा तपशिलही न चुकता आपण दैनिकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडतो ज्यामुळे दानशुरांना प्रेरणा मिळून त्यांच्यातील विश्‍वासही वाढीस लागतो . धन्यवाद .

आपला ,

रविंद्र बांगड,

मुख्य संपादक दैनिक आनंदनगरी , जालना

संपर्क - 9765778888

Our Social Presence

Our Social Activities Album

Our Social Activities Video

व्हिडिओ बातमी:-आनंदनगरी सामाजिक उपक्रम


Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920